मलकापूर: घुस्सर शिवारात शेतातील गोदाम फोडून शेतमाल व रोकडसह ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास
घुस्सर शिवारात शेतातील गोदाम फोडून अज्ञात चोरट्यांनी शेतमाल व रोकड असा ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी घडली आहे.याप्रकरणी राजेंद्र वासुदेव पाटील यांनी ११ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बोराखेडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.