गोंदिया: सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांना पकडले, संजयनगर परिसरातील घटना
शहरातील संजयनगर ते पांगोली नदीकडे जाणाऱ्या मार्गावर विक्की भिवराज कुंजाम (वय ३९) व कैलास झिंगरू लांजेवार (२७, रा. जोगलेकर वॉर्ड, छोटा गोंदिया) विदेशी दारू पीत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. ३० नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्लास्टिकच्या ग्लासमध्ये असलेली दारू जप्त करून नाश केली. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.