लातूर: जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेला क्रीडा संकुलनावर उत्स्फूर्त.जिल्हा क्रीडा अधिकारी कसगावडे यांच्या हस्ते उद्घाटन
Latur, Latur | Sep 17, 2025 लातूर - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर व तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर महानगरपालिका व लातूर ग्रामीण जिल्हास्तरीय मुले व मुली तायक्वांदो स्पर्धा जिला क्रीडा संकुलन येथे दिनांक 15 व 16 सप्टेंबर रोजी संपन्न झाल्या तर या स्पर्धेचा निकाल दिनांक 18 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.