लातूर: यायालयाने विवाहितेचा छळ करून आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपींना 1 वर्ष 6 महिने कारावास आणि दंडाची सुनावली शिक्षा
Latur, Latur | Nov 30, 2025 लातूर-तालुक्यातील आखरवाई गावात 2019 मध्ये घरगुती वर्तुळातील शारीरिक व मानसिक छळामुळे एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या घटनेच्या प्रकरणी न्यायालयाने पती आणि सासूला दोषी ठरवून एक वर्ष सहा महिने सक्त मजुरी कारावास व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या क्र.01 न्यायाधीश आर. आर. भोसले यांच्या न्यायालयाने 28 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या निकालानुसार आरोपी आयुब गफुर पटेल (पती) व झायेदाबी गफुर पटेल यांना कलम 498(अ)/34 अंतर्गत शिक्षा केली.