मच्छिंद्र मनसजन पवार रा. तरोडा ता.चांदुर रेल्वे यांनी देवतारे मनसदन पवार रा. मिलींद नगर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे .देवतारे पवार हा परिवारासह मिलिंद नगरला राहतो. त्याचा मच्छिंद्र याला फोन आला व तो मनाला तू माझ्या सुनेच्या अंगावर हात का टाकला ,तू लवकर मिलिंद नगरला ये. मच्छिंद्र पत्नीसह मिलिंद नगरला गेला व देवतारे याला म्हटले तू माझ्यावर खोटा आरोप का लावतो ?तेव्हा देवतारे यांनी कुकर घेऊन मच्छिंद्र च्या डोक्यावर मारून त्याला जखमी केले व तुला पाहून घेईन अशी धमकी दिली.