लातूर: लातूर पोलिसांचा निवडणूक बंदोबस्तासाठी मोठा 'रूट मार्च', पोलिसांचा तगडा बंदोबस्त,व्यापक तयारी, निर्विघ्न मतदानाची खात्री
Latur, Latur | Nov 30, 2025 लातूर -लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २०२५ पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या असून, ५०० हून अधिक पोलिस कर्मचारी, ४५ अधिकारी, एसआरपीएफचे ६ सेक्शन व होमगार्ड्ससह तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. उदगीर, अहमदपूर, औसा व निलंगा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाचवेळी प्रभावी रूट मार्च काढून गुन्हेगार, समाजकंटक व गोंधळकारकांवर अंकुश ठेवण्यात आला. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा आत्मविश्वास निर्माण झाला.