औसा: जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनीकेली औसा येथील मतदान केंद्रे वस्ट्रॉंगरूमची पाहणी
Ausa, Latur | Nov 27, 2025 औसा -औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी बुधवारी औसा शहरातील मतदान केंद्रे, स्ट्रॉंगरूम तसेच मतमोजणी कक्षाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत पुरवठा, सीसीटीव्ही कव्हरेज, व्हीलचेअर सुविधा, सुरक्षा यंत्रणा आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.