लातूर: “थकबाकीदारांसाठी मनपाची मोठी घोषणा: ‘सेल्फी विथ रिसीप्ट’ शिबिरात ८०% शास्ती माफी”
Latur, Latur | Nov 29, 2025 कर संकलन व कर आकारणी विभाग मार्फत १ डिसेंबर पासून धडक जप्ती/अटकावणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पण तत्पूर्वी थकबाकीदार याना टॅक्स भरण्याची संधी मिळावी या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त (कर संकलन) डॉ पंजाब खानसोळे यांच्या नियोजनातून दि ३० नोव्हेंबर रोजी सेल्फी विथ रिसीप्ट- विशेष कर वसुली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.