गोंदिया: निवडणुकीच्या दिवशी आठवडी बाजार बंद,जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश
Gondiya, Gondia | Nov 28, 2025 जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततामय व निर्भय वातावरणात पार पडावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी निवडणुकीच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.