अमरावती: धम्मचक्र प्रवर्तनामुळेच माणूस आज ताठ मानेने उभा आहे:डॉ. राहुल दखने, विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे व्याख्यान
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही देशातील स्थिती बदलली आहे असे म्हणता येत नाही. मात्र धम्मचक्र प्रवर्तनामुळेच आज माणूस ताठ मानेने उभा आहे, असे प्रखर विचार शिवरामजी मोघे महाविद्यालय, पांढरकवडा येथील इतिहास विभागाचे डॉ. राहुल दखने यांनी मांडले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित ‘धम्मचक्र प्रवर्तनाची वर्तमान काळातील प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते.