नागपूर शहर: बहादूरा येथे मतदाता येण्याआधीच त्यांच्या नावावर झाले मतदान ; उडाली खळबळ
आज नागपूर जिल्ह्यात नगरपरिषद नगरपंचायत निवडणुका पार पडले आहे. यामध्ये बहादूरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक दांपत्य मतदान करायला पोहोचले पण त्यांनी मतदान करण्याआधीच त्यांच्या नावावर मतदान झाले होते. या घटनेने पुन्हा एकदा बोगस मतदान झाले असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.