ठाणे: तुम्हीही झोमॅटोवरुन खाद्यपदार्थ ऑर्डर करताय तर ही बातमी तुमच्यासाठीच, कलिंगडाच्या ज्यूसमध्ये आढळले २ झुरळ
Thane, Thane | Nov 10, 2025 नवी मुंबईच्या नेरूळ येथे एक किळसवाणा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने झोमॅटो वरून एका सँडविच सेंटरमधून ज्यूस सँडविच आणि इतर खाद्यपदार्थ मागवले होते. ते खाद्यपदार्थ आले आणि ज्यूस पीत असताना कलिंगडाच्या ज्यूस मध्ये चक्क दोन झुरळ आढळून आले. त्यानंतर त्यांनी संताप व्यक्त करत हा प्रकार मोबाईल मध्ये चित्रित केला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर हा व्हिडिओ आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,तसेच व्हिडिओ वरून संताप व्यक्त केला जात आहे.