कामठी: नगरपरिषद कामठीतर्फे स्वीप कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी मतदार जागरूकता रॅली उत्साहात
Kamptee, Nagpur | Nov 25, 2025 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि नगरपरिषद कामठीच्या वतीने 25 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजताच्या सुमारास मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय स्वीप कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थी मतदार जागरुकता रॅचे आयोजन करण्यात आले. मतदार जागृतीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता नगरपरिषद अब्दुल सत्तार फारुकि शाळा येथून या रॅलीचा उत्साहात शुभारंभ झाला.