सातारा: सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी चिन्हांची यादी जाहीर, नगरपालिकेच्या कार्यालयासमोर लावण्यात आली 213 चिन्हांची यादी
Satara, Satara | Nov 11, 2025 सातारा नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांना पक्षाची तसेच मुक्त उमेदवारांसाठी चिन्हांची यादी आज नगरपालिकेच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आली आहे. पक्षांकडून 19 चिन्हे तर स्वतंत्र उमेदवारांसाठी तब्बल 194 अशी एकूण 213 चिन्हे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. चिन्हांची यादी जाहीर होताच उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी आपल्या पसंतीचे चिन्ह निवडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. काही उमेदवारांनी तर समर्थकांसह चर्चाही सुरू केली आहे.