ठाणे: अजूनही माणुसकी जिवंत आहे,प्रमाणिक रिक्षाचालकाने रिक्षात विसरलेल्या बारा तोळे सोन्याची बॅग केली परत
Thane, Thane | Nov 11, 2025 वाशी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक व्यक्ती आपल्या आई सोबत रिक्षातून गेला,मात्र त्याची एक बॅग रिक्षात विसरली. त्या बॅगमध्ये तब्बल जवळपास 12 तोळे सोने दागिने होते. आपल्या रिक्षात कोणाची तरी बॅग विसरली आहे, हे लक्षात आल्यानंतर रिक्षाचालकाने वाशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माहिती दिली. त्यानंतर सदरचे प्रवासी तेथे आले आणि आपली बॅग चेक करून पाहिले असता सर्वसामान असल्याची खात्री केली आणि त्यानंतर रिक्षाचालकाचे आभार मानले. याप्रमाणे रिक्षा चालकाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.