चिखली: मेहकर शहरातील कॅफेत सुरू होते अश्लील चाळे; पोलिसांनी धाड टाकून केली पाच जणांवर कारवाई
शहरातील लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या 'पर्पल फूड कॉर्नर कॅफे' वर मेहकर पोलिसांनी १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री धाड टाकून पाच तरुणांना अटक केली. यापैकी तिघे जण अश्लील कृत्य करताना रंगेहात पकडले गेले असून, सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्समधील या कॅफेत अश्लील कृत्ये सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत रात्री सुमारे ११.३० ते १२.३० दरम्यान छापा टाकला.