वाघाच्या हल्ल्यात दुधाळ गाय ठार झाल्याची घटना सकाळच्या सुमारास मासळ शिवारात घडली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूलाच शेतकरी अरुण जिवतोडे यांचा गोठा आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे जनावराने बांधून ठेवले होते. रात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला केल्याने एक दुधाळू गाय ठार झाली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.