शिरूर: विळ्याचा वार आणि नात्याचा अंत; केंदूरमध्ये शेतीच्या वादातून कुटुंबात तुंबळ हाणामारी
Shirur, Pune | Nov 30, 2025 केंदूर (ता. शिरूर) येथे शेतीच्या बांधावर दगड ठेवल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एकाला सावत्र भावाने विळ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सतीश राजाराम थिटे, लता सतीश थिटे आणि सिंधूबाई राजाराम थिटे या तिघांविरूद्ध शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.