हवेली: हिंजवडीत बस चालकाने दोन जणांना चिरडलं, बस चालकाच्या अपघातात दोन जणांच्या दुर्दैवी मृत्यू
Haveli, Pune | Dec 1, 2025 आयटी पार्क हिंजवडी परिसरामध्ये आज संध्याकाळी साडेपाच वाजता दरम्यान भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका खाजगी बस चालकांने शिवाजी चौकात आपल्या बसच्या चाकाखाली दोन जणांना चिरडलं आहे. या अपघातात दोन शाळकरी मुलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.