लातूर: जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Latur, Latur | Dec 1, 2025 लातूर -जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्यावतीने ०१ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघालेल्या या सायकल रॅलीला आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड व सहाय्यक संचालक संजय ढगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.