– रामटेकडी इंडस्ट्रियल एरियामध्ये सायंकाळी ४ वाजता पायी जाणाऱ्या ४४ वर्षीय इसमाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने दुचाकीवरून येत हिसकावून नेला. फिर्यादी यांच्या हातातील तब्बल १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने क्षणात पळवला. घटनेनंतर आरोपी फरार असून त्याचा शोध वानवडी पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी भादंवि ३०४(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून परिसरातील सीसीटीव्ही तपास सुरू आहे.