आंबेगाव: पारगावमध्ये बिबट्याचा महिलेवर हल्ला'; अंगातील स्वेटरमुळे वाचला जीव
Ambegaon, Pune | Nov 6, 2025 पारगाव (ता. आंबेगाव) येथील चिंचगाई मळा येथे काल बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान अश्विनी शिवाजी ढोबळे ( वय -29 वर्ष) या महिलेवर बिबट्याने झडप मारली परंतु सुदैवाने अंगातील स्वेटर मुळे कोणतीही जखम झाली नसली तरी घाबरून अश्विनी ढोबळे या बेशुद्ध पडल्या त्यांना पारगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.