नाशिक: चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराजांच्या जयंती साठी मंदिरे सजली
Nashik, Nashik | Nov 25, 2025 नाशिक परिसरात गोदा घाट येथील खंडेराव महाराज मंदिर येथे चंपाषष्ठी निमित्त जय्यत तयारी चालू असल्याचे चित्र दिसून येत आहे यावेळी मंदिराला रंग रंगोटी करून रंगबिरंगी कलरच्या लाइटिंग लावण्यात आले आहे तर भाविकांसाठी रांगेत दर्शन घेण्यासाठी बॅरिकेट्स लावून उन्हापासून बचाव होण्यासाठी मंडप देखील टाकण्यात आला आहे. मंडपाची पूजाधिकारी उद्या आपल्या घरून देवाचा टाक व घोंगडी घेऊन पारंपारिक वाद्य वाजवून येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत मंदिरात विधिवत पूजा करणार आहे.