कल्याण: डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा, भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब
Kalyan, Thane | Nov 6, 2025 फेरीवाल्यांच्या प्रश्नांवरून भाजपा आक्रमक झाली असून आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास भाजपाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा अशी मागणी केली आहे. ते कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालय येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे.