नागपूर शहर: चितार ओळी येथे मध्य रस्त्यात द बर्निंग बाईकचा थरार ; बघा थरारक व्हिडिओ
चितार ओळी येथे आज मध्य रस्त्यात द बर्निंग बाईकचा थरार अनुभवायला मिळाला. नेहमीच्या या गजबजलेल्या ठिकाणी अचानक एका महागड्या पल्सर दुचाकी ला आग लागली. याचा एक थरारक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. दरम्यान तेथील नागरिकांनी ती आग विझवण्यासाठी त्यावर पाणी टाकले परंतु ही आग भडकली. ज्यामुळे रस्त्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आगवर नियंत्रण मिळविले तसेच वाहतूक कोंडीही सोडविली.