पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर येथील वैदुवाडी परिसरातील किर्लोस्कर ब्रिजवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस ही चक्क मुख्यमार्ग सोडून फुटपाथ वरून धावली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. नागरिकांसाठी पायी जाण्यासाठी बनवलेल्या राज्य सरकारची एसटी बस धावली, यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.