राहुरी फॅक्टरीतील श्रीरामपूर रोडवर भारत कन्स्ट्रक्शनच्या ढंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने राहुल नालकर व आकाश नालकर हे दोघे जखमी झाले. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अवजड वाहतुकीकडून चौकात सातत्याने होणारे दुर्लक्ष व आरटीओ नियमांचे उल्लंघन करून होणारी वाहतूक यामुळे परिसरातील नागरिक संतप्त असून चिंचविहिरे ग्रामस्थ व राजूभाऊ शेटे मित्र मंडळ यांनी प्रशासनाला तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.