खेड: महाळुंगेत कंपनीत शिरलेल्या मोटारीतून मोठा माल लंपास
पिकअप मोटारीतून आलेल्या अज्ञात चोरट्याने कंपनीच्या शॉप मध्ये प्रवेश करत कंपनीच्या साडेचार लाख रुपयांच्या ॲल्युमिनियम धातूचे पार्ट पोत्यामध्ये भरून लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संजय शांतीलाल भंडारी वय वर्ष 56 यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.