संत जनार्दन स्वामी पुण्यतिथी, गीता जयंती, व दत्त जयंती उत्साहात संपन्न दे. माळी तालुका मेहकर येथील श्री.संत जनार्दन स्वामी सेवा आश्रमाच्या वतीने आयोजित संत जनार्दन स्वामी पुण्यतिथी, गीता जयंती व दत्त जयंती सोहळ्यानिमित्त श्री संत जनार्दन स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात, दि.२९ नोव्हेंबर २०२५ रोजी ह.भ.प. रवींद्र महाराज गुरव (कदमापूर) यांच्या सुश्राव्य कीर्तन सेवेने भक्तीचा दिव्य आणि वैचारिक जागर झाला. तसेच हरिभक्त परायण प्रकाश महाराज मगर यांच्या वाणीतून एकनाथी भागवत कथा पार पडली.३ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या भव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध नामांकित कीर्तनकारांचे वैचारिक आणि रसाळ कीर्तन श्रवण करण्याची पर्वणी भाविकांना मिळाली.३० नोव्हेंबर) ह.भ.प.