पनवेल: नवीन पनवेल सेक्टर सहा जवळील नेवाळीकडे जाणाऱ्या ब्रिज जवळ ज्वारी घेऊन जाणारा टेम्पो झाला पलटी
Panvel, Raigad | Sep 16, 2025 मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून ज्वारी घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याची घटना 16 सप्टेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांनी दिली. ज्वारीने भरलेला टेम्पो वाशीच्या दिशेने मुंबई पुणे एक्सप्रेस वेने जात होता. 16 सप्टेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास नवीन पनवेल सेक्टर सहा जवळील नेवाळीकडे जाणाऱ्या ब्रिज जवळ आला असता टेम्पो ब्रिज वरून खाली कोसळला. हा अपघात एवढा मोठा होता की या टेम्पोचे दोन चाक वर अडकले आणि टेम्पो खाली कोसळला.