मेहकर: छ. संभाजी नगर येथील अपघातातील दे.माळी येथील विवाहितेचा अखेर मृत्यू
छत्रपती संभाजी नगर येथील सर्व्हिस रोडवर दुचाकी-स्कुटीची समोरा समोर धडक झाली होती. या धडकेत स्कुटीस्वार महिला गंभीर जखमी झाली होती.हा अपघात शुक्रवारी दुपारी ४ वाजता एएस क्लब रोडवर घडला. बजाजनगरातील द्वारकानगरात राहणारे सुखदेव तुकाराम भराड (५०) यांची पत्नी सौ. राजश्री स्कुटीने ह्या (एमएच-२०-सीसी-२९३६) तिसगावकडून ए.एस. क्लबकडे जात होती. या वेळी समोरुन राँग साईडने आलेल्या दुचाकी (एमएच-२०-सीसी-९२६०) दुचाकीने सौ राजश्री यांच्या स्कुटी राज जबरदस्त धडक दिली.