अंबरनाथ: बदलापूर येथे दोन चोरांना स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं
आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास बदलापूर कात्रप परिसरामध्ये दोन चोरांना स्थानिकांनी रंगेहात पकडल आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्हीही चोरटे उल्हासनगर येथून आले होते. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली व पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या दोन्हीही चोरट्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.