अमरावती: अकोट नगराध्यक्ष पदासाठी गाजियाबानो मोहम्मद बदरुजम्मा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार,आमदार संजय खोडके यांची घोषण
आज १३ नोव्हेंबर गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजता मिळालेल्या माहितीनुसार आगामी २ डिसेंबर २०२५ रोजी होऊ घातलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. अशातच आज दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी गाजियाबानो मोहम्मद बदरुजम्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे..