हातकणंगले: माणगाव ग्रामपंचायतीकडून 'आमचे आई-वडील आमची जबाबदारी' नावाने देशात पहिली नावीन्यपूर्ण योजना जाहीर
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त माणगाव ग्रामपंचायतीने आज विशेष ग्रामसभेत ‘आमचे आई-वडील आमची जबाबदारी’ या नावाने एक आगळीवेगळी व लोकोपयोगी योजना सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत गावातील 65 वर्षे पूर्ण केलेल्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना जीवनभर मोफत ब्लड प्रेशर व शुगरच्या औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत कार्यालयातून दर महिन्याच्या 1 तारखेला ही औषधे दिली जातील. यासाठी आवश्यक निधी ग्रामनिधीतून खर्च करण्यात येणार आहे.