मलकापूर: शहरातील भातृमंडळ येथे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक
मलकापूर शहरातील भातृमंडळ येथे ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मलकापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे,माजी आमदार राजेश एकडे सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.