आर्णी: बेलोरा जंगलातील अवैध हातभट्टी महिलांनी केली उध्वस्त
Arni, Yavatmal | Sep 17, 2025 बेलोरा परिसरात अनेक दिवसांपासून जंगलात अवैध गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी वारंवार पोलीस प्रशासनाला दिली होती. मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने अखेर गावातील महिलांनीच दिनांक 16 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान पुढाकार घेत हा प्रकार उध्वस्त केला. महिलांनी हातभट्टीसाठी वापरली जाणारी पिंपे, डबे, भट्टीचे साहित्य यांची नासधूस करत जागेवरच संपूर्ण भट्टी उद्ध्वस्त केली. “दारूमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे, घराघरात भांडणे वाढत आहेत, तरीदेखील पोलिस व उत्पादन श