कोरेगाव: कोरेगावात बेकायदा प्राण्यांची कत्तल; पोलिसांची धडक कारवाई, गफुर कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल
आर्थिक फायद्यासाठी बेकायदा प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या गफूर कुरेशी याच्या विरोधात कोरेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत मंगळवारी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल केला आहे. गफुर कुरेशी, रा. कालेकर कॉलनी, कोरेगाव हा बिगर परवाना प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मंगळवारी दुपारी दोन वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ओम विजय शेरकर रा. रहिमतपूर यांनी फिर्याद दाखल केली आहे.