करवीर: इतक्यात वर पाठवताय; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचा मिश्किल सवाल आणि सभागृहात एकच हशा
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज व उद्या दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत.पुण्यातून कोल्हापूर पर्यंत जवळपास चार तासांचा प्रवास करत ते कोल्हापुरात पोहोचले.त्यानंतर काही काळ विसावा घेण्यासाठी पंचशील हॉटेल मधील सभागृहात येऊन ते बसले.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आणि आर. के. पवार यांनी साहेब उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत असं सांगितलं हे ऐकताच शरद पवारांनी आर के पवार यांच्याकडे पहात इतक्यात कुठे वर असा मिश्किल सवाल त्यांना केला यावेळी सभागृहात एकच हशा पिकला