कोरेगाव: गोगावलेवाडी रेल्वे मार्गावरील मृत्यू प्रकरणात खळबळ; हत्या झाल्याचा संशय,पारधी समाजाचा १७ नोव्हेंबरला आमरण उपोषणाचा इशारा
गोडसेवाडी परिसरात पुणे–मिरज रेल्वे मार्गावर गोगावलेवाडी हद्दीत किरण आशीर्वाद पवार या फासेपारधी समाजातील या युवकाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृत्यू अपघाती नसून हत्या झाल्याची दाट शक्यता असल्याचे लोकनेते विश्वास मोरे यांनी स्पष्ट केले असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी दुपारी चार वाजता विश्वास मोरे यांच्या नेतृत्वाखाली पारधी समाज बांधवांनी कोरेगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेतली.