गंगापूर भागातील भवर मळा येथे घरफोडी करून चोरट्यांनी एक लाख पाच हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आली असून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कल्पेश माणिक पगार राहणार गंगापूर रोड, भवर मळा यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सोन्याची एक अंगठी, मोबाईल फोन, सोन्याचे कानातले, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची टिकली,चांदीच्या साखळ्या,चार चांदीच्या गणपतीच्या मुर्त्या, तीस हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला.