गोंदिया: जिल्ह्यात मतदान केंद्र १०० मीटर परिसरात मोबाइल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना कडक मनाई
जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगरपरिषद तसेच सालेकसा व गोरेगाव नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान होत असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व मुक्त वातावरणात पार पडावी यासाठी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात मोबाइल व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर कडक मनाई करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता प्