भंडारा: घराजवळ खेळतांना गेला तोल! ५ वर्षीय बालीका विहीरीत कोसळल्याने मृत्यु : कातुर्ली येथील घटना
धान कापणीसाठी आई-वडील शेतात गेले होते. पाच वर्षीय मुलगी आणि तिच्या ३ वर्षीय भाऊ घरी होता. खेळता खेळता दोघेही घराशेजारील सार्वजनिक विहिरीवर गेले. विहिरीवर लावलेल्या रिंगणाजवळ मुलगी खेळू लागली. खेळता खेळता तिचा तोल गेला आणि क्षणार्धात ती विहिरीत पडली. यात विहिरीतील पाण्यात बुडुन तिचा मृत्यू झाला. ही हृदय द्रावक घटना कातुर्ली येथे मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. अक्षरा अजीत कांबळे असे मृतक बालिकेचे नाव आहे.