छत्रपती संभाजीनगर येथील गतिमंद मुलांच्या निवासी विद्यालयातील शिपाई आणि केअरटेकर यांनी निरागस विद्यार्थ्यांवर केलेली अमानुष मारहाणीची घटना ऐकून मन सुन्न झाले.गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण केलेली ही वागणूक माणुसकीला काळीमा फासणारी आहे.आम्ही या राक्षसी कृत्याचा तीव्र निषेध करतो. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असे मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे.