देऊळगाव राजा: श्री संत गजानन महाराजांची पालखी - पायीदिंडी शेगाव येथून श्री संत गजानन महाराज मंदिर कुंभारी येथे परतली
देऊळगाव राजा श्री संत गजानन महाराज मंदिर कुंभारी येथून दिनांक 24 सप्टेंबर रोजी शेगाव साठी संत गजानन महाराज यांची पालखी व पायी दिंडी यांनी प्रस्थान केले होते . दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर कुंभारी येथे पालखी सुखरूप पोहोचली पाच दिवसाचा हा पायी दिंडी सोहळा श्री संत गजानन महाराज सेवाभावी मंडळ कुंभारी यांनी आयोजित केला होता .