उल्हासनगर: पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकून फरार झालेल्या आरोपीला अखेर भिवंडीतून घेतले ताब्यात
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ,बदलापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत होत्या. तशा तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर उल्हासनगर गुन्हेशाखेने एक पथक तयार केले आणि सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. भिवंडी येथील अत्यंत शिताफिने साठ वर्षीय जाफरी नावाच्या आरोपीला मुद्देमाला सह ताब्यात घेतले. दहा चोरीचे गुन्हे या आरोपीच्या विरोधात दाखल असून दहा गुन्ह्यांमधील तो फरार आरोपी होता अशी माहिती मिळत आहे.