अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास इसमास शहर पोलिसांनी जुने सप्तश्रृंगी शाळेसमोर २ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजेदरम्यान पकडले. व त्याच्या ताब्यातून २२४० रुपयाचा देशी दारू मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. स. फौ गजानन गावंडे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जुने सप्तशृंगी शाळे समोर येथे छापा टाकून संदेश सुरेश तायडे वय 29 वर्षे रा. योगीराज कॉलनी, गौलखेड रोड शेगाव यास पकडले.