गोंदिया: इंदूर नैनपुर पेंचवली एक्सप्रेसचा होणार गोंदियापर्यंत विस्तार रेल्वे बोर्डाची हिरवी झेंडी
रेल्वे बोर्डाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत धावणाऱ्या इंदूर नैनपूर पेंचवली एक्सप्रेस 19343 व 19344 चा विस्तार करण्यास मंजुरी दिली आहे त्यामुळे गोंदियाहून थेट इंदूर जाता येणार असून या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे लवकरच ही गाडी बालाघाट मार्गे गोंदियापर्यंत धावेल गेल्या अनेक दिवसांपासून या गाडीचा गोंदियापर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी बालाघाटच्या खासदार भारती पारधी रेल्वे कमिटी व सदस्यांकडून रेल्वे बोर्डाकडे लावून धरण्यात आली होती यानंतर रेल्वे बोर्डाने याला 30 नोव्