आष्टी: ट्रॅक्टरवरून पडल्याने मजुराचा चाकाखाली दबून झाला मृत्यू ...अंतरा रेती घाट जवळील घटना
Ashti, Wardha | Dec 1, 2025 अंतोरा गावाजवळच्या रेतीघाटावरून ट्रॅक्टर मध्ये चोरी चे रेतीभरून जात असताना ट्रॅक्टर खाली पडून चाकाखाली आल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी 30 नोव्हेंबर पहाटेच्या सुमारास घडली.. या घटनेने एकच खळबळ उडाली सुरज झटाले राहणार चिंचोली मृत झालेल्या या मजुराचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली आहे... या संदर्भात मृत्तकाचा भाऊ रोशन साहेबराव झटले यांनी आष्टी पोलिसांना तक्रार दिली.. या संदर्भात पोलिसांनी 30 तारखेला एक वाजून दहा मिनिटांनी गुन्हा नोंद केला..