हवेली: हडपसरमध्ये पुणे-सोलापूर महामार्गावरील अवैध अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई सुरु...
Haveli, Pune | Nov 28, 2025 हडपसर परिसरातील पुणे-सोलापूर महामार्गावर पंधरा नंबर ते गाडीतळ दरम्यानच्या रस्त्यावर वाढलेल्या अवैध अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेने आज शुक्रवारी (ता. 28) सकाळपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान अनधिकृतपणे उभारलेल्या दुकाने व संरचनांवर जेसीबी, ट्रॅक्टर-ट्रकच्या सहाय्याने हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे.