पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त छायाचित्रकार व व्हिडिओ जर्नलिस्ट यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचे व व्हिडिओचे आज बालगंधर्व कलादालन येथे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास भेट देऊन या व्हिडिओ व छायाचित्रांच्या माध्यमातून पुणे शहराच्या सामाजिक राजकीय पटलावरील अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.